Testimonials

गेली १० वर्ष मी टेरेस gardning करतेय. मागील वर्षी पर्यंत इथून तिथून म्हणजे कधी नर्सरी वाले, तर कधी खताची दुकानं, कधी अजून कुणी सांगेल त्याच्याकडून माती, शेणखत, गांडूळ खत आणि इतर ऑरगॅनिक खत घेत होते, पण अव्वाच्या सव्वा किंमत मोजूनही कधी म्हणावी तशी क्वालिटी मिळाली नाही. मागील वर्षी "सुहा अग्रोनीक" (Suha agronic, Junnar) ह्यांच्याकडून २०kg गांडुळ खत घेतले. इतक्या वर्षात मिळाली नव्हती अशी अतिशय उच्च क्वालिटी. मग माती, शेणखत, जीवामृत, दशपर्णी, इतर खते व औषधे मागवली. सगळ्याचा दर्जा अगदी उच्च आणि भाव अगदी माफक. घरपोच सर्व्हिस. आमच्या बद्दल rivew लिहा, असे त्यांनी सांगितले नाही, नी मी rivew लिहू का म्हणून मीही विचारले नाही. हा rivew माझ्या कडून अगदी उस्फुर्त प्रतिक्रिया म्हणून आलाय. आपल्या झाडांसाठी ह्यांचे प्रॉडक्ट्स वापरून बघा, झाडं खुश होऊन कशी तरारून उठतील ते बघूनच त्यांच्या क्वालिटी ची कल्पना येईल.
नारायणी शिरसागर
I bought 5 kg of vermicompost and 1 litre of vermiwash from Suha Agronic. I have seen very good result after 8th day. Seen remarkable difference in greenery and flowers also increased. I am very happy about result and I will buy again.
Shilpa Kadam
मी शिरोली खुर्द येथील शेतकरी. श्री.अजित थोरवे, मी मागील वर्षी सुहा अग्रॉनिक जुन्नर या कंपनीची खते बेसल डोस साठी गांडूळ खत, फॉस्फो कंपोस्ट,निंबोळी आणि नुट्री कंपोस्ट यांचे मिश्रण वापरले आणि त्यानंतर बुरशी आणि पिकांच्या वाढीसाठी जीवामृत आणि व्हर्मी वॉश वापरले. मी टोमॅटो लागवडीच्या वेळी त्यांच्या प्रतिनिधीशी बोलून केमिकल आणि सेंद्रिय खतांचा डोस ठरवला त्यामुळे खर्चात बचत होऊन खूप छान उत्पादन मिळाले. तसेच टुटा माशी चा प्रादुर्भाव होता त्या वेळी सांगितलेले निम ऑईल आणि रासायनिक कीटकनाशके यांचा समतोल राखला. त्यांच्याकडील जीवामृत चा फळे फुगवणी साठी आणि चकाकी साठी खूप फायदा झाला. सोबत त्यांचे व्हर्मी वॉश सुद्धा खूप उपयोगी ठरले. या ही वर्षी मी यांचे पीक व्यवस्थापनाचा उपयोग करून उत्पादन घेणार आहे. मी सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही देखील या खतांचा वापर जास्त प्रमाणात करा आणि खर्चामध्ये बचत करा आणि केमिकल खतांचा वापर कमी करून जमिनीची सुपीकता वाढवा. धन्यवाद
अजित थोरवे
मला मुळातच झाडांची आवड म्हणुन टेरेस मध्ये व घरात काही झाडे लावली त्यामध्ये काही फुलझाडे काही आयुर्वेदिक व काही इनडोअर प्लांटस आहेत. माझ्या काही झाडांवर मावा पडला, काहींची वाढ खुंटली पाने पिवळी पडु लागली, काहींना फुलेच येईनात. मी तुम्हाला कॉन्टॅक्ट केलं व वेळोवेळी तुम्ही दिलेल्या सूचनांप्रमाणे काही झाडांची पुर्ण माती बदलली, त्यामध्ये योग्य प्रमाणात वर्मीवॉश मिक्स केलं. जीवामृत चा वापर ही तुम्ही सांगितल्यानुसार केला. मला 15 दिवसांत झाडांमध्ये अमुलाग्र बदल जाणवला. गुलाबाला खुप कळ्या आल्या आहेत, मावा नष्ट झाला आहे, वाढ छान होत आहे. सर्व झाडे खुप टवटवीत व फुलली आहेत. त्यामुळे मीही खुप खुष आहे 😊.तुमच्या ज्या उत्पादनामुळे माझ्या झाडांना नवसंजीवनी मिळाली ती मी कायम वापरणं सुरु ठेवील व परिचितांना ही रिकमंड करेन. असेच सहकार्य असु द्या. मनापासुन धन्यवाद सुहा ऑर्गनिकस ..keep it up good work you are doing
Jayashree Tikekar
मी 25 एप्रिल 2022 महिन्यात VU5 चवळी पिकाची लागवड केली. आणि माझ्या मागील आणुभवा नुसार अगदी सुरुवातीपासून बुरशी चे नियंत्रण करण्यासाठी मी सुहा अग्रॉनिक कंपनी ओझर यांचे मार्गदर्शन घेऊन जैविक खते गांडूळ खत आणि बुरशीनाशके वापरली. त्यामुळे चवळी चा उतार आणि वाढ अतिशय सुंदर आणि झपाट्याने झाली.माझ्या या पिकमधून मला लक्षणीय उत्पादन मिळाले. त्यांच्या प्रतिनिधींची वेळोवेळी केलेले मार्गदर्शन खर्च कमी आणि उत्पादन वाढवण्यासाठी उपयोगी ठरले.माझे 10 गुंठ्यांत एकूण उत्पादन 3146 किलो निघाले आणि खर्च रु.22,340 आला आणि उत्पादन रू.1,09,430/- रासायनिक खतांची मात्रा कमी आणि सेंद्रिय व जैविक जीवामृत, व्हर्मी वॉश, निम आणि करंज ऑईल,तसेच बुरशी नाशक खते इ. खते वापरली ज्यामुळे खर्च कमी झाला. आणि उत्पादन वाढले. शेतकऱ्यांनी सुहा अग्रोनिक कंपनी ची खते वापरावी हा सल्ला मी देतो त्या मुळे खर्च कमी होतो आणि जमिनीचा पोत सुधारतो. धन्यवाद
रघुनाथ शेळके
शेवंती पीक व्यवस्थापन
मी कुसुर गावातील शेतकरी आसून मी 6 एकर क्षेत्रावर शेवंती फुलांची लागवड केलेली आहे.माझे नाव श्री. उत्तम ताजने, कुसुर जुन्नर किल्याच्या पायथ्याशी माझे गाव आसून फुलांसाठी प्रसिद्ध आहे. मी सुहा अग्रॉनिक कंपनीची माहिती घेऊन त्याचा कारखान्याला भेट देऊन तिथे उत्पादित होत असलेले गांडूळ खत, फोस्फो कंपोस्ट, व्हर्मिवाश,जीवामृत स्वतः जाऊन पाहिले आणि प्रायोगिक तत्वावर सर्व खतांचा वापर केला. दर 1 महिन्यानंतर जीवामृत आणि व्हर्मी वॉश हे ड्रिप द्वारे सोडले तसेच एक तोडा झाल्यानंतर फुलांचा आकार आणि झाडांची हिरवळ कमी झाली त्यासाठी देखील यांनी सांगितलेले स्पेशल जीवामृत ड्रिप मधून सोडले त्यानंतर फुलांची क्वालिटी खूप सुधारली तसेच कळ्यांमध्ये वाढ झालेले आढळून आले. या वर्षी पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे जैविक खतांचा विचार करून रसानिक खतांचा वापर अतिशय कमी प्रमाणात केला ज्यामुळे उत्पादन खर्च कमी झाला आणि उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली.मी इतर शेतकऱ्यांना सुद्धा सुहा अग्रोनिक च्या निविष्ठा आणि जीवामृत व्हर्मिवॉश वापरण्याचा सल्ला देईल. धन्यवाद टीम सुहा....
उत्तम ताजने

Our Products Are Available On Amazon

amazon-buttton.png